जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
श्री संत रविदास चर्मकार समाज बहुउद्देशीय संस्था, विठ्ठलनगर (जत) यांच्या वतीने संत शिरोमणी श्री संत रविदास महाराज यांची जयंती सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता भजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता दीपप्रज्वलन करून संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास आमदार, माजी आमदार, नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, व्यापारी, पत्रकार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व समाजबांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


