yuva MAharashtra जत च्या सुकन्या व राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त, रायगड विभागाच्या उपाधीक्षक मा.पुष्पलता दिघे-चव्हाण यांचा सत्कार

जत च्या सुकन्या व राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त, रायगड विभागाच्या उपाधीक्षक मा.पुष्पलता दिघे-चव्हाण यांचा सत्कार

जत वार्ता न्यूज
By -

राजे रामराव महाविद्यालयाच्या  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :

      राजे रामराव महाविद्यालय, जत शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षभरात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यासाठी तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या विविध स्पर्धेत गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी राजे रामराव महाविद्यालयाने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 10,00 वाजता महाविद्यालयामध्ये आयोजित केला असून त्याचबरोबर जतच्या सुकन्या व रायगड विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मा.पुष्पलता दिघे चव्हाण यांना पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पदक  मिळालेबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कृष्णा रानगर यांनी दिली. 

           अधिक माहिती देताना ते म्हणाले की, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व रायगडच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रमुख पोलीस उपाधीक्षक पुष्पलता दिघे- चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचे अध्यक्ष, आजीव सेवक डॉ.श्रीराम साळुंखे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे, श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे, श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे याबरोबर जत शहर व पंचक्रोशीतील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने शुक्रवार दि. १६ रोजी गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व प्राध्यापक यांचा सत्कार व शेलापागोटे कार्यक्रम, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना प्रमुख प्रा.अनुप मुळे, प्रा.अभिजीत चव्हाण व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले आहे.