yuva MAharashtra खा. विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील प्रलंबित कामांचा ६ मार्चला आढावा

खा. विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील प्रलंबित कामांचा ६ मार्चला आढावा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     जत तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या प्रलंबित कामांचा सखोल आढावा घेण्यासाठी शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस खासदार विशाल पाटील हे अध्यक्षस्थानी राहणार असून माजी आ.विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
     तालुक्यातील सिंचन, रस्ते, आरोग्य, महसूल तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
     संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रलंबित प्रकरणांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि स्थानिक प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
     या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते तसेच जत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.