जत/प्रतिनिधी :
जत नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १ विठ्ठलनगर येथून नगरसेवकपदी भरघोस मतांनी विजयी झालेल्या नूतन नगरसेवक कुमार साळे यांचा सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कामगार संघ, जत आगार यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुमार साळे यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडून प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी सेवा शक्ती संघर्ष संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ, खोजणवाडीचे माजी सभापती रमेश बिराजदार, जत आगार अध्यक्ष रामचंद्र रणशिंगे, जत आगार सचिव पोपट शिंदे, जत आगार कार्याध्यक्ष बाबुराव व्हनंखंडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

