yuva MAharashtra साहित्य सेवा मंचाच्या अध्यक्षपदी लवकुमार मुळे; उपाध्यक्षपदी माणिक कोडग यांची निवड

साहित्य सेवा मंचाच्या अध्यक्षपदी लवकुमार मुळे; उपाध्यक्षपदी माणिक कोडग यांची निवड

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत शहरातील मराठी साहित्य सेवा मंचाच्या अध्यक्षपदी लवकुमार मुळे यांची तर उपाध्यक्षपदी माणिक कोडा यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकत्याच शांगाव येथे पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
     या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक महादेव बुरटे यांनी भूषविले होते. संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थापक सदस्य लवकुमार मुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याच बैठकीत प्रा. माणिक कोडग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
     नवीन कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी मच्छिंद्र इनामदार, कार्याध्यक्षपदी प्रा. कुमार इंगळे, कार्यवाहपदी रशीद तांबोळी, सचिवपदी राजेश कोळी, सहसचिवपदी विष्णुपंत शिंदे, प्रसिद्धी प्रमुखपदी किरण जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून राकेश यादव, सुनील देशमुख, डॉ. श्रीकांत कोकरे, विजय नाईक, मोहन माने-पाटील, महादेव बुरटे आदींचा समावेश करण्यात आला आहे.
     बैठकीदरम्यान शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. जून महिन्यापासून शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षी शेगाव येथेच वार्षिक संमेलन घेण्याचेही ठरले. या बैठकीस संस्थेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: