yuva MAharashtra जतमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा; ‘संघटन सृजन अभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जतमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा; ‘संघटन सृजन अभियान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
        जत येथे काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आ. थोटा लक्ष्मीकांत राव, राजेंद्र शेलार, श्रीमती शैलजा पाटील तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
     मेळाव्यासाठी जत तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
     उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. गावपातळीपर्यंत काँग्रेसची ताकद वाढवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचे धोरण आणि भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
     या मेळाव्यामुळे जत तालुक्यात काँग्रेस संघटनेला नवचैतन्य मिळाल्याचे चित्र दिसून आले असून, कार्यकर्त्यांमध्ये आगामी काळात पक्ष बळकट करण्याबाबत उत्साह निर्माण झाल्याचे जाणवले.