yuva MAharashtra उटगी व सोन्याळ येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वर्धापन दिन उत्साहात; संचालक मन्सूर चाचा खतिब यांचे मार्गदर्शन

उटगी व सोन्याळ येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वर्धापन दिन उत्साहात; संचालक मन्सूर चाचा खतिब यांचे मार्गदर्शन

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
      तालुक्यातील उटगी व सोन्याळ येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक मन्सूर चाचा खतिब यांनी उपस्थित राहून सभासदांना मार्गदर्शन केले.
       यावेळी वरिष्ठ, तरुण व महिला सभासदांसह विविध सेवा सोसायट्यांचे चेअरमन, उपाध्यक्ष व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी बँक कर्मचारी आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
       मार्गदर्शन करताना मन्सूर चाचा खतिब यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना व उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बँक कटिबद्ध असून विविध महामंडळांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बँकेच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
      या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, पंचायत समिती सदस्य महादेव आप्पा अंकलगी, अमोल कराडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष शिवानंद माडग्याळ, माजी सभापती बसवराज बिराजदार, मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष पाटील, महानतेश पाटील, जालिंद्र मामा होनमाने, भिवा खरात, डॉ. संजय कराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.