yuva MAharashtra ‘स्वच्छ जत’चा संकल्प; विठ्ठलनगर पश्चिमेत जागर फाउंडेशनची विशेष स्वच्छता मोहीम

‘स्वच्छ जत’चा संकल्प; विठ्ठलनगर पश्चिमेत जागर फाउंडेशनची विशेष स्वच्छता मोहीम

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने विठ्ठलनगर पश्चिम भागात जागर फाउंडेशनच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. आमदार गोपिचंद पडळकर आणि नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
     या मोहिमेचे नेतृत्व जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, “शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ही चळवळ प्रत्येक प्रभागात राबवली जाईल,” असा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह नगरपरिषदेच्या पथकाने परिसरातील साचलेला कचरा हटवून रस्ते व परिसर स्वच्छ केला.
     यावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष मच्छिंद्र जतकर, सचिव सिद्धू जाधव, तसेच नगरसेवक राजकुमार साळे, अवी साळे, विशाल पाथरूट, सागर मोरे, अजित भिसे, आनंद कांबळे, प्रसाद शिंदे आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
     जागर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे विठ्ठलनगर परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले असून, अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.