yuva MAharashtra संस्कार, कर्तृत्व आणि प्रेमाने उजळलेली ७५ वर्षांची जीवनयात्रा; प्रा. गुलाबराव पाटील यांचा जीवन अमृत महोत्सव तथा पंच्याहत्तरावा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न

संस्कार, कर्तृत्व आणि प्रेमाने उजळलेली ७५ वर्षांची जीवनयात्रा; प्रा. गुलाबराव पाटील यांचा जीवन अमृत महोत्सव तथा पंच्याहत्तरावा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ; 
     कुटुंब, समाज आणि विविध क्षेत्रांतील योगदानातून आयुष्याची ७५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण करणारे सेवानिवृत्त प्रा श्री गुलाबराव आबासाहेब पाटील यांच्या जीवन अमृत महोत्सव तथा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
     "संस्कार, कर्तृत्व आणि प्रेमाने उजळलेली जीवनयात्रा" या भावनेतून आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अॅड. नरेंद्र पाटील यांनी केले. यावेळी डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. मदन बोर्गीकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे यशवंतराव चव्हाण, प्रमुख वक्ते प्रा. जयसिंगराव सावंत (कोल्हापूर), जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, विलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     सोहळ्यात विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री गुलाबराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. त्यांच्या साधेपणा, सामाजिक बांधिलकी, कुटुंबवत्सल स्वभाव आणि समाजाभिमुख कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या आयुष्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
     प्रा. जयसिंगराव सावंत यांनी आपल्या अभिष्टचिंतनपर भाषणात, "एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील खरा ठेवा म्हणजे त्याने कमावलेली माणसे आणि समाजातील सन्मान. श्री गुलाबराव पाटील यांनी ही दोन्ही संपत्ती विपुल प्रमाणात कमावली आहे," असे गौरवोद्गार काढले. त्यांनी दोन मुलेही चांगल्या प्रकारे घडवली आहेत मोठा मुलगा श्रीनिवास पाटील हा इंजिनियर असून अमेरिकेत नोकरी करतो तर लहान मुलगा अॅड. नरेंद्र पाटील हा मुंबई हायकोर्टात वकिली करतो.
     कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. चंद्रसेन माने-पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात कृतज्ञता, स्नेह आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
     यावेळी मदन पाटील, डॉ मनोहर मोदी, विश्वनाथ शिंदे, धनाप्पा ऐनापुरे, मनोज जेऊर, श्रीकृष्ण पाटील, तानाजी भोसले, शहाजी बापू भोसले, यशवंत शिंदे, मधुकर शिंदे, प्रा. करेणावर, पत्रकार दिनराज वाघमारे, मोहन माने-पाटील, संतोष शिरसाड, किरण बिज्जरगी, बाळासाहेब तंगडी, निलेश बामणे, विलास शिंदे, किरण जाधव, सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जीवनातील अनुभवांच्या सुवर्णछटांनी नटलेल्या या अमृतमहोत्सवी सोहळ्याने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण केल्या.

"माणसांची श्रीमंतीच खरी कमाई"
     श्री गुलाबराव आबासाहेब पाटील यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आयुष्यभर जपलेल्या नातेसंबंधांची आणि समाजसेवेची हीच खरी कमाई असल्याची भावना यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. ७५ वर्षांच्या जीवनप्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.