टीव्हीवरील मालिकेत स्वामीं समर्थांची भूमिका वटवीणारे श्री. स्वामींभक्त श्री. राहुल जाधव ( कराड ) यांच्या उपस्थितीने प्रत्यक्ष श्री.स्वामी समर्थ अवतरल्याची भक्तांची भावना
जत | प्रतिनिधी;
जत येथील छत्रपती शिवाजीराजे नगरात श्री.स्वामी समर्थांचे भव्य असे मंदिर असून या मंदीरात श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.
श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यामार्फत दर पोर्णीमेला पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा, त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, यानंतर दुपारी बारा वाजता श्रींची आरती तसेच श्री.चरणी फुले वाहने व त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप असे नित्याचे कार्यक्रम सुरू आहेत.
बुधवारी गुरूपोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदीरात अकर्षक अशी सजावट करण्यात आली होती.आज सकाळपासूनच श्री.स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो स्वामीभक्तांनी रांग लावली होती.
बुधवारी श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली.त्यानंतर रामपूर येथील विरशैव भजनीमंडळाचा भजनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न झाला.दुपारी श्रींची आरती करण्यात येऊन श्री.स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कराडवरून श्री स्वामी समर्थ टीव्ही चॅनेल वर समर्थांची भूमिका करणारे श्री. राहुल जाधव हे स्वामींची वेशभूषा करून स्वामींभक्तांच्यामध्ये उपस्थित होताच स्वामींभक्तांनी त्यांचे दर्शन घेतले.याप्रसंगी प्रत्यक्ष श्री. स्वामी समर्थच प्रकटल्याची भावना स्वामींभक्तांची झाली होती.
यावेळी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठाण जत चे अध्यक्ष श्री.प्रभाकरभाऊ जाधव, माजी प्राचार्य श्री.वसंतराव बोराडे, , सेवानिवृत्त प्राध्यापिका निर्मला मोरे, इंजनिअर श्री. विश्वनाथ शिंदे,बिराप्पा वगरे ,श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, माजी नगरसेविका सौ. शारदा कुंभार,संभाजी जाधव, शिवाजी पवार, संतोष पट्टणशेट्टी, तानाजी यादव, सुशांत तांदळे, अमित कोळी, आदींसह शेकडो भक्तांनी श्री.स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, मोहन पवार,सागर वसमाळे,आबासाहेब शिंदे, पिंटू मोरे, अतुल मोरे, शहाजीबापू भोसले, समर्थ पवार, राघव जोशी आदीनी परिश्रम घेतले.
जत शहरातील विविध ठिकाणीही मोठ्या उत्साहात गुरू पोर्णीमा साजरी करण्यात आली.या ठिकाणीही शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


