जत | प्रतिनिधी ;
स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. महाविद्यालय जीवनात चांगला अभ्यास केला तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून न्यूनगंड बाळगू नका कारण कष्ट व परिश्रम करण्याची सर्वाधिक तयारी ग्रामीण भागातील मुलांमध्येच असते. आणि परिश्रम व कष्ट करणारी मुलेच जीवनात यशस्वी होतात असे प्रतिपादन प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी केले
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "विद्यार्थी उद्बोधन वर्गाच्या" उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर डहाळके हे होते. यावेळी प्रोफेसर डॉ.आप्पासाहेब भोसले, दुपार सत्रातील उपप्राचार्य डॉ.अरविंद पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी उद्भवधन विकास मंडळाचे समन्वयक डॉ.नारायण सकटे यांनी मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी उद्बोधन वर्गाचा उद्देश सांगितला.
या विद्यार्थी उद्बोधन वर्गामध्ये डॉ.लक्ष्मण भरगंडे, डॉ.भीमाशंकर डहाळके, डॉ.अण्णासाहेब गुरव, डॉ.पुंडलिक चौधरी यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असलेले विभाग व अभ्यासक्रम पूरक उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मणराव मासाळ यांनी तर आभार प्रा.सुरेश वळवी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी उद्बोधन वर्गाचे सदस्य डॉ.सोमनाथ गायकवाड, प्रा.धनजंय वाघमोडे, प्राध्यापिका जयश्री बाळिकाय यांनी परिश्रम घेतले.

