yuva MAharashtra महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापनदिन जत येथे संपन्न होणार

महार रेजिमेंटचा ८६ वा वर्धापनदिन जत येथे संपन्न होणार

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     भारतीय सैन्याच्या गौरवशाली परंपरेचा मानबिंदू असलेल्या महार रेजिमेंटचा ८६वा वर्धापनदिन सोहळा १ ऑक्टोबर २०२६ रोजी जत येथील जत-अथणी मार्गावरील शोभा मल्टिपर्पज हॉल येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांसह वीरपत्नी, वीरमाता-पिता व वीरपाल्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
     महार रेजिमेंटची स्थापना १ ऑक्टोबर १९४१ रोजी झाली असून यंदा रेजिमेंटला ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. शौर्य, त्याग आणि देशसेवेच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करण्यासाठी हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आले आहे.

महार रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन -
     महार रेजिमेंटने भारतीय लष्कराच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्याबरोबरच आजी-माजी सैनिकांमधील एकजूट दृढ करण्याच्या उद्देशाने वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     जत येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांची मोठी उपस्थिती राहणार असल्याने सैनिक कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महार रेजिमेंटचा अभिमान आणि सैनिकांची एकजूट जपत हा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक -
संजय माने जयसिंगपूर, कोल्हापूर

दत्तात्रय शिंदे जत, सांगली