जतवार्ता न्यूज नेटवर्क;
आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, जत येथे आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दरीबडची जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे जत तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत झाली असून ग्रामीण भागात पक्षाचा जनाधार वाढत असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रवेश कार्यक्रमात सरपंच शिवानंद मोर्डी, उपसरपंच बहिरू मुंजे, चेअरमन संजय मोरडी, मल्लिकार्जुन पुजारी, श्रीशैल पुजारी, गुरुपाद बसर्गी, उपसरपंच धुंडाप्पा मल्लाड, ग्रामपंचायत सदस्य विठोबा ऐवळे, राजेंद्र नागठाण, राकेश शिंगे, विकास मोरडी, पिंटू स्वामी, संजय माळी, शिवनिंग जामगोंड, पिंटू जामगौंड, मंतेस मदभावी, बाबगोंडा पाटील, शिवानंद स्वामी, राजाराम ऐवळे, लक्ष्मण बसर्गी, राजेंद्र मोरडी, ईश्वराया स्वामी, कुमार बसर्गी, पिराप्पा बसर्गी, बसगोंडा बसर्गी, अंबाजी माळी, सुखदेव माळी, संजय माळी यांच्यासह धुळकरवाडीचे सरपंच अनिल माळी, भिमगोंडा माळी व माजी सरपंच प्रकाश बन्नूर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून भाजपची ध्येयधोरणे, विकासाभिमुख भूमिका आणि केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक परशुराम मोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर प्रवेशामुळे येणाऱ्या काळात दरीबड गटासह संपूर्ण जत तालुक्यात भाजप अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

