जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सांगली,१ जानेवारी ,२०२६ : सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने सांगली येथे जानेवारी मध्ये संपन्न होणाऱ्या ५९ व्या संत निरंकारी संत समागमाच्या पार्श्वभूमीवर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा सांगली यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी फल्ले मंगल कार्यालय ,बायपास रोड टोल नाक्याजवळ सांगलीवाडी येथे सकाळी ९ ते सायं.५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते. त्याच हेतूने निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या शिकवणीनुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी निरंकारी जगतामध्ये लाखोंच्या संख्येने मिशनचे अनुयायी रक्तदान करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहेत त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमही मिशन मार्फत राबविले जातात रक्तसंकलन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांचेमार्फत होणार आहे.
रक्तदानाबरोबर आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिर मध्ये जापनीज काँम्प्युटरद्वारे डोळे तपासणी,मोती बिंदू शस्त्रक्रिया,काचबिंदू,डोळ्यावरील मांस अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.
तरी रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिराचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सातारा सांगली झोनचे झोनल इन्चार्ज श्री नंदकुमार झांबरे यांनी केले आहे .

