yuva MAharashtra ‘आत्ममंथन’ विषयासह सांगलवाडीत २४ ते २६ जानेवारीला ५९वा महाराष्ट्र निरंकारी संत समागम

‘आत्ममंथन’ विषयासह सांगलवाडीत २४ ते २६ जानेवारीला ५९वा महाराष्ट्र निरंकारी संत समागम

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     सांगली,  समाजात वाढत असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मानवतेची वीण अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘आत्ममंथन’ या विषयावर ५९वा महाराष्ट्र प्रादेशिक निरंकारी संत समागम दि. २४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान सांगलवाडी (ता. सांगली) येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात होणाऱ्या या समागमात देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू सहभागी होणार आहेत.
     सुमारे ३२० एकर परिसरात होणाऱ्या या भव्य आयोजनासाठी ३० हजारांहून अधिक सेवादल पूर्ण समर्पणाने सेवा बजावत आहेत. लंगर (महाप्रसाद), आरोग्य सुविधा, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पार्किंग व सहाय्यता केंद्रांसह सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तिन्ही दिवशी दुपारी २.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत मुख्य सत्संग, भक्तीमय संगीत व कवी दरबाराचे आयोजन होणार असून, समारोप सद्गुरुंच्या प्रेरणादायी प्रवचनांनी होईल.
     समागमस्थळी ‘आत्ममंथन’ विषयावरील भव्य निरंकारी प्रदर्शनी, ज्ञान कक्ष, प्रकाशन स्टॉल्स तसेच मोफत वाहतूक व २४ तास लंगर व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. संत निरंकारी मिशनच्या वतीने सर्व श्रद्धाळू व नागरिकांना या आध्यात्मिक समागमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.