yuva MAharashtra शाकंबरी पौर्णिमेनिमित्त जत येथील श्री. स्वामी समर्थ मंदिरासह तालुक्यातील विविध मंदिरांत भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा

शाकंबरी पौर्णिमेनिमित्त जत येथील श्री. स्वामी समर्थ मंदिरासह तालुक्यातील विविध मंदिरांत भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत येथील श्री. स्वामी समर्थ मंदिरासह शहर व तालुक्यातील विविध मंदिरांत शनिवारी शाकंबरी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच विविध देवस्थानांत अभिषेक, महापूजा, आरती व भजनाचे कार्यक्रम पार पडले. ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
     श्री. स्वामी समर्थ मंदिरात पहाटे बापूसाहेब पवार यांच्या हस्ते महाराजांची अभिषेक महापूजा करण्यात आली. जत नगरीची ग्रामदेवता श्री. यल्लमा देवी मंदिरात पुजारी सुभाष व स्वप्नील कोळी यांनी देवींची अभिषेक महापूजा करून पहाटे आरती केली. डोंगरनिवासिनी श्री. आंबाबाई मंदिरात पुरोहित अनिल देशपांडे यांनी श्री. अंबिका देवी, श्री. गणेश, श्री. दत्तात्रय व श्री. महादेव यांची विधिवत अभिषेक पूजा व आरती केली. तसेच श्री. विठ्ठल–रुक्मिणी मंदिर व जत बसस्थानकातील श्री. दत्त मंदिरात पुरोहित दत्ता पुरोहित यांनी अभिषेक व आरती केली.
     जत शहरासह तालुक्यातील श्री. क्षेत्र बनाळी येथील श्री. बनशंकरी देवी, श्री. क्षेत्र गुड्डापूर येथील श्री. दानम्मा देवी, कोळगिरी येथील श्री. भैरवनाथ, बिळूर येथील श्री. काळभैरवनाथ, श्री. क्षेत्र मुचंडी येथील श्री. दरेश्वर, संगतीर्थ येथील श्री. रामेश्वर, अचकणहळळी येथील श्री. बिसल सिद्धेश्वर, सोरडी येथील श्री. दत्त मंदिर तसेच श्री. दत्त गगनगिरी आश्रम, रामपूर आदी तीर्थक्षेत्रांतही शाकंबरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
     श्री. स्वामी समर्थ मंदिरात शाकंबरी पौर्णिमेनिमित्त सकाळी रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी सव्वाबारा वाजता श्री. स्वामी समर्थ महाराजांची आरती, स्वामी चरणी पुष्प अर्पण आणि त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
     या कार्यक्रमास श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, शहाजीबापू भोसले, दिपक पाटणकर, ॲड. वैभव भोसले, माजी प्राचार्य वसंतराव बोराडे, अनिल पोरे, रामभाऊ संकपाळ, अनिल पवार, मोहन पवार, समर्थ पवार, शिवाजीराव पवार, अतुल मोरे, प्रभाकरभाऊ जाधव यांच्यासह असंख्य भक्तगण उपस्थित होते.

Tags: