yuva MAharashtra दरीबडची गटात सामाजिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व; श्रीमंत तांबे भाजपचे विश्वासार्ह चेहरा

दरीबडची गटात सामाजिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व; श्रीमंत तांबे भाजपचे विश्वासार्ह चेहरा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     दरीबडची जिल्हा परिषद गटात भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत तांबे यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात अग्रक्रमाने चर्चेत आहे. केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे, आंदोलनातून घडलेले आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
     श्रीमंत तांबे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक तसेच दुर्लक्षित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेक वेळा आंदोलने करून प्रशासनाला जागे केले. अन्याय सहन न करता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका दरीबडची गटातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
     सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्त्व ही श्रीमंत तांबे यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. कोणताही प्रश्न हाताळताना केवळ भावना न मांडता त्यामागील कारणे, शासकीय नियम व उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करून ते भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांच्या आंदोलनांना दिशा मिळते आणि प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पाठपुरावा होतो.
     भाजप संघटनेशी निष्ठावंत राहून त्यांनी तळागाळातील लोकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. पक्षाचे विचार, विकासाचे धोरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दरीबडची गटात भाजपचा जनाधार अधिक मजबूत करण्यासाठी ते उपयुक्त ठरतील, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
     सध्याच्या राजकीय परिस्थितीत जनतेशी थेट जोडलेले, संघर्षशील आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत असून, त्याच पार्श्वभूमीवर श्रीमंत तांबे यांचे नाव भाजपकडून पुढे येत आहे. उमेदवारी निश्चित झाल्यास दरीबडची जिल्हा परिषद गटात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.