yuva MAharashtra राजे रामराव महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ

राजे रामराव महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ

जत वार्ता न्यूज
By -
                   
जतवार्ता न्यूज नेटवर्क; 
     राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शारीरिक शिक्षण विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ८.00 वाजता रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कृष्णा रानगर यांच्या शुभहस्ते पार पडले.
     या क्रीडा स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. तर स्पर्धांचे स्वरूप, नियम व शिस्त याबाबतची सविस्तर माहिती प्रा. अनुप मुळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
     उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. कृष्णा रानगर हे होते. यावेळी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गावडे, जिमखाना विभागाचे सदस्य प्रा. दीपक कांबळे, प्रा. भाग्यश्री माळी तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     हा वार्षिक क्रीडा महोत्सव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी अशा क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.