yuva MAharashtra २५ वर्षांच्या निस्वार्थ सेवेला डावलले; अशोक सवदे यांना उमेदवारी नाकारल्याने डफळापूर गणात भाजपविरोधात तीव्र नाराजी; भाजपने आपला निर्णय बदलावा

२५ वर्षांच्या निस्वार्थ सेवेला डावलले; अशोक सवदे यांना उमेदवारी नाकारल्याने डफळापूर गणात भाजपविरोधात तीव्र नाराजी; भाजपने आपला निर्णय बदलावा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     डफळापूर पंचायत समिती गणात गेल्या २५ वर्षांपासून कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा करणारे अशोक महादेव सवदे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सवदे यांची दखल पक्षाने न घेतल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
     अशोक सवदे यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, ना कोणत्याही पदाची हाव धरली. माणूसकी, सेवाभाव आणि प्रामाणिकपणा हाच त्यांच्या कामाचा पाया राहिला. जनतेच्या आग्रहामुळे त्यांनी प्रथमच राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र इतक्या प्रदीर्घ कालावधीतील निस्वार्थ सेवेची दखल उमेदवारीच्या वेळी न घेतल्याने “सेवेला न्याय न मिळाल्याची वेदना” व्यक्त केली जात आहे.
     डफळापूर गणातील जागरूक नागरिकांनी भाजपकडे ठाम मागणी केली असून, अजूनही निर्णय बदलण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “ही धमकी नसून आक्रोश आहे, ही बंडखोरी नसून वेदना आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. २५ वर्षे अखंड सेवा करणारा माणूस आज न्याय मागतो आहे, पण तोच नाकारला जात असल्याची खंत सर्वसामान्यांमध्ये आहे.
     सध्या गणातील नागरिक संयम राखून असले तरी संयमालाही मर्यादा असतात, असा इशाराही देण्यात आला आहे. जर वेळीच योग्य निर्णय घेतला गेला नाही तर जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि त्याची जबाबदारी पक्षावर राहील, असे मत व्यक्त होत आहे.
     दरम्यान, डफळापूर पंचायत समिती गणातील नागरिकांची एकच ठाम, भावनिक आणि शेवटची मागणी आहे — भाजपने आपला निर्णय बदलावा आणि अशोक सवदे यांना उमेदवारी द्यावी. अन्यथा या अन्यायाविरोधात जनभावना अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हा अपमान सहन नाही” भाजप उमेदवाराला
मतदान न करण्याचा निर्णय;
     २५ वर्षे अखंड सेवा केली, कधी पदाची मागणी नाही, कधी स्वार्थाचा विचार नाही—आणि आज पहिल्यांदाच मागणी केली, तीही सरळ नाकारली गेली.
     हा अपमान केवळ अशोक महादेव सवदे साहेबांचा नाही, तर डफळापूर पंचायत समिती गणातील प्रत्येक सेवाभावी, प्रामाणिक कार्यकर्त्याचा आहे. भाजपने अजूनही वेळ असताना निर्णय बदलावा, तिकीट अशोक सवदे साहेबांनाच द्यावे, हीच जनतेची ठाम व भावनिक मागणी आहे. अन्यथा यावेळी भाजप उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय नागरिक घेतील, याची गंभीर नोंद पक्ष नेतृत्वाने घ्यावी.