yuva MAharashtra निरंकारी भक्त श्री नेताजी हरिबा गोरे यांचे निधन

निरंकारी भक्त श्री नेताजी हरिबा गोरे यांचे निधन

जत वार्ता न्यूज
By -
 

जतवार्ता न्यूज नेटवर्क |जत; 
     येथील ज्येष्ठ नागरिक व संत निरंकारी मंडळ, शाखा जतचे मुखी श्री जोतिबा गोरे यांचे वडील श्री नेताजी हरिबा गोरे (वय ८०) यांचे सोमवारी रात्री १०:४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जत शहरासह संत निरंकारी परिवारात शोककळा पसरली आहे.
     श्री गोरे हे संत निरंकारी मंडळाचे परम भक्त म्हणून ओळखले जात होते. जत शहरातील पहिले निरंकारी भक्त म्हणून त्यांची विशेष ख्याती होती. प्रारंभीच्या काळात जत तालुक्यात सत्संगाची उभारणी व विस्तार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठा, चिकाटी आणि समर्पण भाव जपत त्यांनी सत्संग वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले.
     मंडळाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. विविध धार्मिक ग्रंथ व साहित्याचे ते अभ्यासू वाचक होते. आयुष्यभर सत्संग, सेवा आणि समर्पण या तत्त्वांनुसार त्यांनी कार्य करत समाजात आदर्श निर्माण केला. त्यांच्या प्रेमळ, शांत आणि सेवाभावी स्वभावामुळे समाजात त्यांना मानाचे स्थान लाभले होते.
     त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी जत येथे करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. श्री गोरे यांच्या निधनाने जत तालुक्यातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Tags: