जतवार्ता न्यूज नेटवर्क;
संख जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवार सौ. कविता किरण पाटील यांनी प्रचारात प्रचंड वेग घेतला असून संपूर्ण गटात त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेल्या त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे.
सौ. कविता पाटील या प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटीगाठी घेत, नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट व ठोस भूमिका मांडली आहे. “विकास हेच आमचे ध्येय” हा संदेश देत त्यांनी प्रचारात सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.
भाजपच्या संघटित ताकदीसह कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून प्रचार फेऱ्यांना दिवसेंदिवस अधिक वेग मिळत आहे. प्रचार सभांमध्ये व जाहीर भेटींमध्ये मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता, सौ. कविता पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही “काम करणारी, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारी आणि विकासाभिमुख नेतृत्व” अशी प्रतिक्रिया देत सौ. कविता किरण पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. संख जिल्हा परिषद गटात भाजपच्या विजयाचा मार्ग या प्रचार दौऱ्यामुळे अधिकच मजबूत झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

