yuva MAharashtra नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज |डफळापूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन

नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज |डफळापूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     जत तालुक्यातील डफळापूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला.
     या शिबिराचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शासनाने सुरू केलेल्या अशा शिबिरांमुळे नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांचे जलद निराकरण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
     महाराष्ट्र शासन व सांगली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जमीन नोंदी, दाखले, महसूल विषयक प्रकरणे तसेच इतर प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
     शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. प्रशासनाने या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शासनाच्या सेवा अधिक लोकाभिमुख व गतिमान होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
     या कार्यक्रमास प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, बीडीओ मुक्तेश्वर माडगुळकर, जलसंपदा विभागाचे अभियंता रोहित कोरे, माजी सभापती अकराम मासाळ, भाऊसो दुधाळ, दिग्विजय चव्हाण, महेश गाडवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमा क्षीरसागर तसेच महसूल, आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.