yuva MAharashtra वज्रवाड येथे बाजरी बियाणे वाटप व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

वज्रवाड येथे बाजरी बियाणे वाटप व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

जत वार्ता न्यूज
By -

जत, प्रतिनिधी :
     राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वज्रवाड (ता. जत) येथे बाजरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत श्री विठ्ठल बिरदेव स्वयंसहाय्यता गट, वज्रवाड यांना बाजरी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर आत्मनिर्भरता अभियानांतर्गत बाजरी पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
     कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सुनील सातपुते, उपकृषी अधिकारी राजेंद्र जंगम, सहायक कृषी अधिकारी दिलीप कोळी तसेच स्वयंसहाय्यता गटाचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य उपस्थित होते.
     यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुनील सातपुते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना यंदाच्या वर्षी ‘एल-निनो’ (El Niño) प्रभावामुळे पर्जन्यमानावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची माहिती दिली. बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून कमी कालावधीत येणारी व कमी पाण्यावर तग धरणारी पिके घेण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
     तसेच बाजरी पिकाच्या सुधारित लागवड पद्धती, बियाण्यांचा योग्य वापर, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना बाजरी लागवडीबाबत उपयुक्त माहिती मिळाली असून आगामी खरीप हंगामासाठी त्यांना मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.