yuva MAharashtra जत तालुक्यात जिल्हापरिषद–पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम | ९२ उमेदवार रिंगणात; तिरंगी-चौरंगी लढतींमुळे निवडणूक अटीतटीची

जत तालुक्यात जिल्हापरिषद–पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम | ९२ उमेदवार रिंगणात; तिरंगी-चौरंगी लढतींमुळे निवडणूक अटीतटीची

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होत असलेल्या जत तालुक्यातील ९ जिल्हापरिषद गट व १८ पंचायत समिती गणांच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर एकूण ९२ उमेदवार अंतिम निवडणूक रिंगणात उभे राहिले असून, बहुतांश ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार आहेत.
     जत तालुक्यातील या निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रशासकीय भवन, जत येथे उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. आज जिल्हापरिषदेसाठी ६० अर्ज तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज असे एकूण १४३ अर्ज मागे घेण्यात आले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी दिली.
     दरम्यान, कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र चिंचली येथील श्री. मायाक्का देवी यात्रेचा मुख्य दिवस याच दिवशी आल्याने, यात्रेचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने विशेष जनजागृती करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

जिल्हापरिषद ९ गटासाठी एकूण ३५ उमेदवार पुढीलप्रमाणे :-
जादरबोबलाद :
भाग्यश्री संजयकुमार तेली (भा.ज.पा.), सावित्री तम्मनगौडा रवी (राष्ट्रवादी काँग्रेस), सिंधुताई विठ्ठल पुजारी (अपक्ष)
उमदी :
यलगोंडा आमसिद्धा तोरणे (भा.ज.पा.), विठ्ठल मनोहर सातपुते (कॉंग्रेस), सुनील कांताप्पा सातपुते (शिवसेना), अरुणकुमार सायबान्ना हिंदुस्थानी (अपक्ष)
संख :
कावेरी प्रवीण आवरादी (शिवसेना), कविता किरण पाटील (भा.ज.पा.), भारती बसवराज पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रियंका रघुनाथ सबकाळे (जनसुराज्य शक्ती)
दरिबडची :
अमोल तम्मा कराडे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार), आनंद आप्पासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सरदार संपतराव पाटील (भा.ज.पा.), मीरासाहेब मोहोद्दीन मुजावर (शिवसेना), श्रीशैल भीमराया पाटील (अपक्ष), गजानंद चनबसाप्पा बागेळी (अपक्ष)
मुचंडी :
श्रीकांत कृष्णा गुरव (शिवसेना), रमेश गंगान्ना देवर्षी (भा.ज.पा.), रमेश इरगोंडा पाटील (कॉंग्रेस)
बनाळी :
सुनील रावसाहेब पवार (भा.ज.पा.), रविंद्र तानाजीराव सावंत (कॉंग्रेस), प्राची महादेव हिंगमिरे (शिवसेना)
शेगाव :
शिवाजी अशोक खिलारे (भा.ज.पा.), परशुराम दरिबा सांगोलकर (कॉंग्रेस), किसन आकाराम टेंगले (रासप), शरद दामोदर सरगर (अपक्ष)
डफळापूर :
आक्काताई मलकाप्पा दुधाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), काजल रमेश दुधाळ (कॉंग्रेस), स्वप्नाली मनोज मासाळ (भा.ज.पा.), श्रीमती रुक्मिणी कृष्णदेव कोरे (अपक्ष), राजश्री अमोल पांढरे (अपक्ष)
बिळूर :
लक्ष्मीबाई शिवानंद कुंभार (राष्ट्रवादी काँग्रेस), सुजाता निलप्पा चौखंडे-माळी (कॉंग्रेस), शिल्पा रविकुमार जीवांनावर (भा.ज.पा.)
     वरीलप्रमाणे ९ जिल्हापरिषद गटासाठी एकूण  ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत.

पंचायत समिती १८ गणासाठी निवडणूक रिंगणात उभे असलेले एकूण ५७ उमेदवार पुढीलप्रमाणे :-
जाडरबोबलाद गण :
रेणुका आराणी (भा. ज. पा.), कल्पना अंकलगी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 
माडग्याळ गण :
शालनताई कोरे ((नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), मंगलाबाई बंडगर (भा. ज. पा).
उमदी गण :
लता कुळळोळी (भा. ज. पा.), संगीता सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस).
करजगी गण :
उत्तमराव कट्टीमणी (भा. ज. पा.), राघवेंद्र व्होनमोरे (इंडियन नॅशनल काँग्रेस)
संख गण :
प्रकाश करांडे (शिवसेना ),तुकाराम टोणे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), सदाशिव दर्गाकर (भा. ज. पा.), बिरूदेव खोत ( जनसुराज्य शक्ती), संतोष कुंभार. (अपक्ष)
गिरगांव गण :
राजकुमार चव्हाण (शिवसेना), रविकुमार बगली (भा. ज. पा.), नागनाथ मोटे (जनसुराज्य शक्ती), जगदेवा बिराजदार ( अपक्ष)
दरिबडची गण :
लक्ष्मण चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुरेश टेंगले (शिवसेना), आप्पासो थोरात (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),गुरूपाद बसरगी (भा. ज. पा.), दरेश्वर चौगुले (अपक्ष),
तिकोंडी गण :
वैजंता व्हनमाने (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार), नकुसा शेंडगे ( भा. ज. पा.),
मुचंडी गण :
सुनीता बेडगे (भा. ज. पा.), अश्विनी मोरे (इंडियन नॅशनल काँग्रेस)
खोजानवाडी गण :
भाग्यश्री पवार (इंडियन नॅशनल काँग्रेस), वीणा बिरादार ( भा. ज. पा.), अंकिता कोळेकर (अपक्ष )
बनाळी गण :
अण्णासो कोडग (शिवसेना), मिलिंद पाटील (भा.ज. पा.), प्रमोद सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस), 
येळवी गण :
अशोक गोरड (शिवसेना), मधुकर नरळे (इंडियन नॅशनल काँग्रेस), विजय रुपनूर ( भा. ज. पा.)लक्ष्मण पाटील (अपक्ष),
शेगाव गण :
सचिन बोराडे (भा. ज. पा.), चंद्रकांत शिंदे (शिवसेना), साहेबराव शिंदे ( इंडियन नॅशनल काँग्रेस),
कोसारी गण :
दिपाली चव्हाण ( इंडियन नॅशनल काँग्रेस), सुनीता टेंगले (शिवसेना), अर्चना पाटील (भा. ज. पा.), कमलाबाई जानकर ( अपक्ष )
डफळापूर गण :
हणमंत कोळी ( भारतीय कम्युनिस्ट पक्ष), महेश गावडे (भा. ज. पा.), बाबासाहेब माळी (इंडियन नॅशनल काँग्रेस), किरण कोळी (अपक्ष), प्रवीण गडदे ( अपक्ष)
बाज गण :
अरुणा गडदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), सारिका गडदे (इंडियन नॅशनल काँग्रेस), मनीषा दुधाळ (भा. ज. पा.)
बिळूर गण :
श्रीशैल कोटगोंड (शिवसेना), बसवराज घेज्जी (इंडियन नॅशनल काँग्रेस), भैराप्पा मासाळ (भा. ज. पा.), तुकाराम कित्तुरे (अपक्ष)
उमराणी गण :
मीनाक्षी अभंगे (भा. ज. पा.),श्रीदेवी कट्टीमणी( इंडियन नॅशनल काँग्रेस), 
     असे एकूण ९२ उमेदवार जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुक रिंगणात उभे आहेत. या सर्व गणांत बहुरंगी लढती दिसून येतील.
प्रतिष्ठेची लढाई;
      या निवडणुकीत भा.ज.पा. आमदार श्री. गोपीचंद पडळकर, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, माजी आमदार श्री. विलासराव जगताप, श्री. विक्रमसिंह सावंत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुजय उर्फ नाना शिंदे, माजी सभापती श्री. सुरेशराव शिंदे, श्री. तम्मनगौडा रविपाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मन्सूर खतीब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
      एकूणच, जत तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका अटीतटीच्या, चुरशीच्या व बहुरंगी होत असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.