yuva MAharashtra जगतगुरू स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जत येथे भव्य व्याख्यानाचे आयोजन

जगतगुरू स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जत येथे भव्य व्याख्यानाचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प पू शुकदास महाराज यांना प्रेरणास्थानी मानून विवेक बसव प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली आहे. विवेक-बसव प्रतिष्ठान, जत यांच्या वतीने जगतगुरू स्वामी विवेकानंद यांच्या १६३ व्या जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
     या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, वेदांताचार्य, शिवभक्त चरित्रकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, डी. लिट. सन्मानित व धर्मभूषण श्री. गजाननदादा शास्त्री पवार हे “युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद” या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
     हा कार्यक्रम रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत जत येथील शिवानुभव मंडप येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
     स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार व समाजप्रबोधनाच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विवेक-बसव प्रतिष्ठान, जत यांच्या वतीने करण्यात आले आहे.