yuva MAharashtra शेगाव जि.प. गटात भाजप उमेदवार डॉ. शिवाजी खिलारे यांना मोठा बळकटीचा पाठिंबा; अपक्ष शरद सरगरांचा बिनशर्त पाठिंबा

शेगाव जि.प. गटात भाजप उमेदवार डॉ. शिवाजी खिलारे यांना मोठा बळकटीचा पाठिंबा; अपक्ष शरद सरगरांचा बिनशर्त पाठिंबा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क :
      सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शेगाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले शरद दामोदर सरगर यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत आज भारतीय जनता पक्षाचे शेगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी अशोक खिलारे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
     हा पाठिंबा जत तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी आमदार पडळकर यांनी विकासाच्या राजकारणावर भर देत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
      या प्रसंगी शेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय दादासाहेब पाटील, वाळखिंडी गावचे माजी सरपंच संभाजी आबा शिंदे, महादेव बुरुंगले, आशिष शिंदे सरकार, बेवनूर गावचे माजी सरपंच रावसाहेब दादा सरगर, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी सरगर, किरण सरगर, अजित सरगर, अशोक कुठे, विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
      पाठिंबा जाहीर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद सरगर व त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. तसेच शेगाव जिल्हा परिषद गटातून डॉ. शिवाजी खिलारे यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
      या घडामोडीमुळे शेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीत भाजप उमेदवार डॉ. शिवाजी खिलारे यांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.