yuva MAharashtra आमदार गोपीचंद पडळकर मंत्री व्हावेत म्हणून तरुणाने पाठीवर कळस घेऊन घातला दंडवत

आमदार गोपीचंद पडळकर मंत्री व्हावेत म्हणून तरुणाने पाठीवर कळस घेऊन घातला दंडवत

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री व्हावेत, अशी मनोमन इच्छा व्यक्त करत जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील तरुण गंगाधर लेंगरे यांनी अनोख्या पद्धतीने निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली. जत शहरातील गणपती मंदिर ते ग्रामदेवता यल्लमा देवी मंदिरापर्यंत पाठीवर कळस ठेवून दंडवत घालत त्यांनी प्रवास केला. या कृतीमुळे त्या तरुणाच्या आमदार पडळकर यांच्यावरील निष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
     शुक्रवारी सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास जत शहरातील रामराव नगर येथील गणपती मंदिरातून गंगाधर लेंगरे यांनी दंडवत प्रवासास सुरुवात केली. पाठीवर कळस घेऊन त्यांनी गणपती मंदिरापासून ग्रामदेवता यल्लमा देवी मंदिरापर्यंत दंडवत घालत मार्गक्रमण केले. श्रद्धा आणि राजकीय निष्ठा यांचे अनोखे दर्शन या उपक्रमातून घडले.
     यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व सोबत राहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, नगरसेवक परशुराम मोरे, स्वच्छता व आरोग्य सभापती गौतम ऐवाले, नगरसेवक कुमार साळे, श्रीमंत तांबे, राजू यादव, पाणीपुरवठा सभापती फिरोज नदाफ, अतुल मोरे, प्रकाश मोटे, किरण शिंदे, पांढरेवाडीचे सरपंच बिरप्पा तांबे, गोपाल पाथरुट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
     गंगाधर लेंगरे यांच्या या दंडवत प्रवासामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून आमदार पडळकर यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि श्रद्धा पाहून नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले जात आहे.