yuva MAharashtra रमजान ईदनिमित्त डॉ. रवींद्र आरळी यांची सदिच्छा भेट | शफिक इनामदार यांच्या घरी सत्कार; एकतेचा संदेश

रमजान ईदनिमित्त डॉ. रवींद्र आरळी यांची सदिच्छा भेट | शफिक इनामदार यांच्या घरी सत्कार; एकतेचा संदेश

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
       पवित्र रमजान ईद सणानिमित्त जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी शफिक इनामदार यांच्या घरी सदिच्छा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी इनामदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
       या प्रसंगी बोलताना डॉ. आरळी यांनी सणांचे महत्त्व अधोरेखित करत, “सण हे केवळ आनंद साजरे करण्यासाठी नसतात, तर परस्परांतील नाती अधिक दृढ करण्याची संधी असते,” असे सांगितले. त्यांनी गावातील आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष प्रा. चंद्रसेन माने पाटील तसेच जॉकेश आदाटे यांचा इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जत नगर परिषदेचे युवा नगरसेवक गौतम भाऊ ऐवळे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, धार्मिक पुस्तक व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
     यावेळी मकबूल नदाफ, शाकीर पटाईत, आल्ली शेख, मोहन माने पाटील, इज्जाज इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.