yuva MAharashtra सोलनकर चौकातील खड्डे दुरुस्तीचे काम ३१ मार्च अखेर पूर्ण करू; राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र

सोलनकर चौकातील खड्डे दुरुस्तीचे काम ३१ मार्च अखेर पूर्ण करू; राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पत्र

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत शहरातील सोलनकर चौक परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाकडून संबंधितांना पत्र पाठवून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली आहे.
     जत येथील सोलनकर चौक परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडे अर्ज करून तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. तसेच १० मार्च २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
     या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात सांगण्यात आले आहे की, संबंधित रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. सोलनकर चौकातील खड्डे भरून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम लवकर सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.