yuva MAharashtra जत नगरीत मायाक्का–भाग्यवंती देवी यात्रेला भाविकांचा जनसागर; रथ-पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले

जत नगरीत मायाक्का–भाग्यवंती देवी यात्रेला भाविकांचा जनसागर; रथ-पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :

     जत शहरात श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. यानिमित्त आयोजित भव्य संत बाळू मामा रथ मिरवणुकीसह पालखी व ग्रामफेरीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

     यात्रेची सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पूजनाने झाली. धनगरी ढोल, ताशा, सनई व हलगीच्या निनादात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. विविध मार्गांवरून फिरलेल्या या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. मारुती मंदिर येथे पालखी भेट सोहळा पार पडला.

     दिवसभर अभिषेक, रुद्राभिषेक, भजन, महाआरती तसेच १०१ सुहासिनींचा ओटी भरणे यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

    यावेळी संतांच्या सानिध्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुजाऱ्यांनी केलेल्या भाकणुकीमुळे भाविकांमध्ये चर्चा रंगली. महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे जत नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

Tags: