yuva MAharashtra नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना विद्या मोटे यांचा आधार |साध्य फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत; विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद

नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना विद्या मोटे यांचा आधार |साध्य फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत; विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी : 
      जत तालुक्यात अलीकडे झालेल्या वादळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध दुःखद घटनांमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांची साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा शिवसेना नेत्या अँड. सौ. विद्या मोटे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. मोटेवडी, खलाटी तसेच तालुक्यातील विविध भागांना भेट देत त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर दिला.
     या भेटीदरम्यान साध्य फाउंडेशनच्या वतीने बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित कुटुंबीयांच्या अडचणी शासन स्तरावर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अँड. सौ. विद्या मोटे यांनी यावेळी दिले.
     वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. अनेक कुटुंबांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व घटकांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
     यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे, दर्याप्पा जतकर, विवेक चव्हाण, सुरेश टेंगले, पांढरेवाडीचे सरपंच बीराप्पा सरगर, पांडोझरीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.