yuva MAharashtra अचकनहळ्ळीत विजयमाला कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; महिला हळदी-कुंकू समारंभासह समाजप्रबोधनपर भारूडाचा कार्यक्रम

अचकनहळ्ळीत विजयमाला कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; महिला हळदी-कुंकू समारंभासह समाजप्रबोधनपर भारूडाचा कार्यक्रम

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी
     अचकनहळ्ळी गावच्या कन्या तथा भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला पतंगराव कदम (ताईसाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महिला हळदी-कुंकू समारंभ तसेच ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड (आळंदी देवाची) यांचा समाजप्रबोधनपर भारूड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
     हा कार्यक्रम मंगळवार, २ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषद केंद्र शाळा मैदान, अचकनहळ्ळी येथे पार पडणार आहे.
     कार्यक्रमाचे उद्घाट जिल्हा परिषद सांगलीचे उपाध्यक्ष ऋषिकेश महेंद्र (आप्पा) लाड हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विक्रमसिंह सावंत असणार आहेत.
     यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जतचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, अभिजित दादा कदम पतसंस्थेचे संस्थापक सचिव विक्रम (शेठ) शिंदे, जत एस.टी. आगार व्यवस्थापक सुनंदा देसाई तसेच विक्रम फाउंडेशनच्या संचालिका वर्षाताई विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत.
     कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ परिवार, अचकनहळ्ळी ग्रामपंचायत कार्यालय तसेच श्री बिसलसिद्धेश्वर देवस्थान समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.