yuva MAharashtra कुमारी समीक्षा पाळेकर हिची नवोदय विद्यालय, पलूस येथे निवड; शिक्षक भारती जतकडून सत्कार

कुमारी समीक्षा पाळेकर हिची नवोदय विद्यालय, पलूस येथे निवड; शिक्षक भारती जतकडून सत्कार

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     सिद्धार्थ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा पाळेकर हिची नवोदय विद्यालय, पलूस येथे प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल शिक्षक भारती, जत यांच्या वतीने तिचा बुके ऐवजी बुक  देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी उपस्थित मान्यवरांनी समीक्षा पाळेकर हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामागे तिची मेहनत, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. नवोदय विद्यालयातील निवड ही तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची पायरी असून, तिने पुढील शिक्षणातही असेच उल्लेखनीय यश संपादन करावे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
     या सत्कार समारंभास शिक्षक भारती, जतचे अध्यक्ष दिगंबर सावंत, अविनाश सुतार, रमेश कोळी, जितेंद्र बोराडे, श्रावणकुमार कोरे, मोहन चौगुले, बाळासाहेब सोलनकर, बाळासाहेब जायभाये, श्रीदेवी कांबळे, नामदेव पाळेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती, जतच्या वतीने कुमारी समीक्षा पाळेकर हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.